Join us  

Hansika Motwani: आपल्याच मेंहदीच्या कार्यक्रमात हंसिका मोटवानीने होणाऱ्या नवऱ्यासोबत केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 11:27 AM

Hansika Motwani: हंसिका आणि सोहेलच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन जयपूरमध्ये सुरु झाले आहेत.

साऊथ अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये हे लग्न होणार आहे. जयपूरमध्ये दोघांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन सुरु झाले आहेत. हंसिका मोटवानीच्या मेहेंदी सेरेमनीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. लाल आणि पिवळ्या रंगाच्या एथनिक आउटफिटमध्ये हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. तर  सोहेलने पीच आणि क्रिम कलरचा कुर्ता आणि पायजामा घातलेला दिसतोय.  

हंसिका मेहंदी कार्यक्रमादरम्यान नाचताना दिसत आहे. हंसिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतोय. हंसिकाच्या शेजारी सोहेल शेजारी बसलेला दिसतोय. सोहेलने मेहेंदी कार्यक्रमा दरम्यान हंसिकासोबत डान्स केला. हंसिकाचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोहळ्याला फक्त हंसिकाचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. हंसिकाच्या या फोटोंवर चाहते त्यांच्या प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोंवर कमेंट करताना यूजर्स हंसिकाला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

रिपोर्ट्सनुसार, हंसिका 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरच्या मुंडोटा फोर्टमध्ये बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघेही अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या लग्नाच्या विधींना आता सुरुवात झाली असून सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.

लग्नसोहळ्या आधी सोहेलनं हंसिकाला फिल्मी अंदाजात प्रपोझ केले होते. सोहेलने हंसिकाला आयफेल टॉवरसमोर लग्नासाठी प्रपोज केले. गुडघ्यावर बसून, सोहेलने आपल्या लेडीलव्हला अंगठी घातली.

टॅग्स :हंसिका मोटवानीसेलिब्रिटी