Join us  

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाचा 'मास्टरमाइंड' आहे एक अभिनेता, कधीकाळी तो होता सुपरमॉडल?

By अमित इंगोले | Published: October 02, 2020 10:00 AM

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग् नेक्सस मागे 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो सुपरमॉडल होता.

बॉलिवूडमधील ड्रग चॅट प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुलप्रीत सिंह यांची एनसीबीने चौकशी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कथित बॉलिवूड ड्रग् नेक्सस मागे 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो सुपरमॉडल होता.

सीएनएन-नेटवर्क 18 च्या रिपोर्टनुसार,  बॉलिवूड ड्रग्स केस प्रकरणात आणखी तीन कलाकार आणि कथित 'मास्टरमाइंड' एक अभिनेता आहे जो कधी सुपरमॉडल होता. या तिघांना येणाऱ्या काही दिवस एनसीबी समन्स पाठवू शकते. एनसीबी या तपासातून अशा लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे जे लोक सिने इंडस्ट्रीतील कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांना ड्रग सप्लाय करत आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, कथित 'मास्टरमाइंड' या प्रकरणातील मोठा खेळाडू आहे आणि असेही मानले जाते की, तो सर्वच पेडलर्ससोबत जुळलेला आहे. तोच इंडस्ट्रीतील लोकांसाठी ड्रग्सची खरेदी-विक्री करतो. पण यावर एनसीबीकडून काहीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही किंवा कुणाचं नावही घेतलं नाही.

रियाचे वकील म्हणाले होते...

रिया चक्रवर्तीचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुलाखतीत सांगितले होते की, अभिनेत्रीने चौकशीदरम्यान कोणत्याही अभिनेत्याचं किंवा अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही. ते म्हणाले की, रियाने तिच्या जबाबात कुणाचंही नाव घेतलं नाही. जर एनसीबी किंवा कुणीही असा दावा करत असेल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. याचा काहीच पुरावा नाही की, रियाने सुशांत सिंह राजपूतशिवाय कुणाचं नाव घेतलं होतं.

एनसीबीने २० लोकांना केली अटक

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत केसमधून जेव्हा ड्रग्सचं प्रकरण समोर आलं तेव्हापासून एनसीबीने आतापर्यंत २० लोकांना अटक केली आहे. अनेक लोकांना समन्स पाठवला. दुसरीकडे सुशांतच्या केसचा तपास सीबीआय करत आहे. पण त्यांनाही ठोस असं काहीही हाती लागत नाहीये. 

टॅग्स :बॉलिवूडअमली पदार्थदीपिका पादुकोणरिया चक्रवर्तीनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो