Join us  

'गदर 3' अन् 'बॉर्डर 2' बाबत अभिनेता सनी देओलनचं दिलं मोठं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 12:20 PM

सध्या चाहत्यांमध्ये 'गदर 3' आणि 'बॉर्डर 2' ची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सनी देओलनं मौन सोडलं आहे.

अभिनेता सनी देओलसाठी वर्ष 2023 हे खूप खास राहिले.  'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटाचा सीक्वेल 'गदर 2' मधून त्याने जबरदस्त पुनरागमन केलं. या चित्रपटातील तारा सिंग या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी तितकेच प्रेम दिलं, जे 22 वर्षांपूर्वी 'गदर : एक प्रेम कथा' चित्रपटाच्या रिलीजच्या वेळी दिलं होतं.  'गदर 2'ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. सीक्वेलच्या या तुफान यशादरम्यान आता चाहत्यांमध्ये 'गदर 3' आणि 'बॉर्डर 2' ची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सनी देओलनं मौन सोडलं आहे.

सनी देओलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'गदर 3' आणि 'बॉर्डर 2'वर भाष्य केलं. सनी देओलने 'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना सांगितले की, 'जेव्हापासून 'गदर 2' आला तेव्हापासून मी 'गदर 3' करतो आहे, अशा अफवा पसरवल्या जात आहे. मी नेमके किती आणि कोणकोणत्या चित्रपटांचे सिक्वेल करणार आहे. यात बऱ्याचशा अफवा आहेत. प्रत्येक गोष्टीवरुन अफवा उडवली जात आहे. माझ्या चित्रपटाविषयी मीच घोषणा करेल. पण, लोकांना अंदाज वर्तवण्यात आणि मोठमोठया गप्पा मारण्यात जास्त आनंद वाटतो'.

पुढे तो म्हणाला, 'सर्व अफवा पसरल्या जात आहे. आता फक्त 'लाहोर 1947'वर काम सुरू आहे. कारण, 'गदर 2' यशस्वी ठरला, म्हणून हा चित्रपट बनवला जात आहे. गेल्या 15-17 वर्षांपासून आम्ही या चित्रपटाशी कनेक्ट आहोत. पण गोष्टी पुढे सरकत नव्हत्या. माझ्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. पण मी या सगळ्याचा दबाव घेत नाही'. 

'लाहोर 1947' चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत आणि आमिर खान निर्मित आहे. सनी देओल आणि राजकुमार यांनी यापूर्वी घायाळ आणि दामिनीसारखे हिट चित्रपट एकत्र दिले आहेत. सनी देओलला दामिनीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. दरम्यान, चाहत्यांकडून 'गदर 3' आणि 'बॉर्डर 2' ची मागणी केली जात आहे. सनी देओलचा 'बॉर्डर 2' हा सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं.  

टॅग्स :सनी देओलसेलिब्रिटीसिनेमाबॉलिवूड