Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता श्रेयस तळपदेला अद्याप डिस्चार्ज नाही, अँजिओप्लास्टीनंतर स्वतःच दिली हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 23:22 IST

श्रेयसला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं

Shreyas Talpade Health Update: अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा धक्का आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तात्काळ त्याच्यावर अँजिओप्लास्टीही करण्यात आली. श्रेयस उपचारांना प्रतिसाद देत असून तुमच्या प्रार्थनेची गरज असल्याची पोस्ट पत्नी दीप्ती तळपदेने केली होती. आता पाच दिवसांनंतर श्रेयसने स्वतः आपली हेल्थ अपडेट दिली आहे. 

14 डिसेंबर रोजी सिनेमाचं शूट झाल्यानंतर श्रेयसला घरी अस्वस्थ वाटू लागले. म्हणून त्याच्या पत्नीने त्याला लगेच रुग्णालयात नेले. तेव्हा वाटेतच त्याला हृदयविकाराचा धक्का आला होता. अँजिओप्लास्टी केल्यानंतर पाच दिवसानंतर श्रेयस ने पहिल्यांदाच आपली हेल्थ अपडेट दिली. Zoom शी संवाद साधताना श्रेयस म्हणाला, "तुम्ही सर्वांनी केलेली प्रार्थना आणि दिलेल्या पाठिंब्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आता मला पहिल्यापेक्षा जरा बरे वाटत आहे." तसंच श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला का? या प्रश्नावर त्याने 'अजूनपर्यंत नाही' असे उत्तर दिले.

श्रेयस अजूनही रुग्णालयातच आहे. त्याला कधी डिस्चार्ज मिळेल याविषयी काही कळू शकलेले नाही. सुदैवाने तो धोक्याच्या बाहेर आहे. त्यामुळे चाहत्यांच्याही जीवात जीव आला आहे.

'वेलकम टू जंगल' या सिनेमाच्या शूटिंग मध्ये श्रेयस व्यस्त होता. याचेच शूटिंग संपल्यानंतर तो घरी गेला तेव्हा त्याला अस्वस्थ वाटू लागले. श्रेयसचे हृदय 10 मिनिटांसाठी बंद पडले होते अशी माहिती बॉबी देओलने दिली होती.  श्रेयसच्या पत्नीने परिस्थितीचं भान राखत त्याला तातडीने अंधेरीच्या बेलव्ह्यू रुग्णालयात ऍडमिट केले.

टॅग्स :श्रेयस तळपदेहृदयविकाराचा झटकाहॉस्पिटल