शाहरुख खान भलेही बॉलिवूडचा किंग म्हणवला जात असला तरी बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह तर सलमान खानच आहे. त्यामुळे त्याचे फ्लॉप सिनेमेही सहजपणे १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करतात. सलमान हा बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, २०१७ मध्ये सलमान खान याने २३२ कोटी रुपये कमावले. सलमान खान खर्च करण्यातही पुढे आहे. त्यामुळे त्याच्याकडे इतक्या महागड्या वस्तू आहेत. ज्याच्या किंमती वाचून तुमची बोलती बंद होईल.
सायकल
सलमान अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर सायकलिंग करताना दिसतो. सलमानच्या या सायकलची किंमत ४ लाख ३२ हजार रुपये इतकी आहे. इतक्या रुपयात तर एक कार खरेदी करता येईल.
बाईक
केवळ जॉन अब्राहम आणि महेंद्र सिंह धोनी यांनाच बाईकची क्रेझ नाहीये तर सलमान खानलाही बाईक खूप आवडतात. सलमानकडे चार बाईक आहेत. ज्यांची किंमत १५ ते १६ लाखांच्या दरम्यान आहे.
लक्झरी कार
सायकल आणि बाईक्ससोबतच सलमान खान हा कारचाही शौकीन आहे. सलमान खानकडे तब्बल ९ लक्झरी कार्स आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीजपासून ते लॅन्ड क्रूजर, ऑडी, रेंज रोव्हर या गाड्या आहेत.
प्रायव्हेट यॉर्ट
सलमान खान याने त्याच्या ५०व्या वाढदिवसाला एक यॉट खरेदी केलं होतं. या यॉटची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे.
गॅलक्सी अपार्टमेंट
शाहरुखच्या मन्नत बंगल्याप्रमाणेच सलमानचं गॅलक्सी अपार्टमेंटही खूप प्रसिद्ध आहे. आज या घराची किंमत १६ कोटी रुपये सांगितली जाते.
ट्रिप्लेक्स फ्लॅट
सलमान खान याने वांद्रे परिसरात उबर लक्झरी अपार्टमेंटमध्ये ११वा मजला विकत घेतला आहे. याची किंमत आज ३० कोटींपेक्षा अधिक सांगितली जाते.
पनवेल फार्म हाऊस
पनवेलमध्ये १५० एकर परिसरात सलमानचं फार्म हाऊस आहे. यात तीन बंगले आहेत. त्यासोबतच इथे जिम ,पूल, अनेक पाळीव प्राणी ज्यात ५ घोड्यांचाही समावेश आहे. या फार्म हाऊसची आजची किंमत ८० कोटी रुपये आहे.
गोराई बीचवरील घर
सलमानने त्याच्या ५१व्या वाढदिवसाला गोराई बीचवर एक ५ बीएचके फार्म हाऊस खरेदी केला होता. याची किंमत १०० कोटी रुपये आहे.
क्लोदिंग ब्रॅन्ड
सलमान खान याचा बीईंद ह्युमन नावाने क्लोदिंग ब्रॅंडही आहे. याची मार्केट व्हॅल्यू २३५ कोटी रुपये आहे. तर मिळालेल्या उत्पन्नातून सलमानला ८ ते १० टक्के भाग दान करतो.