Join us

अभिनेता पप्पू पॉलिस्टर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 18:24 IST

हिंदी चित्रपटसृष्टीत पप्पू पॉलिस्टरच्या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध विनोदवीर सैयद बदरुल हसन खान बहादूर यांचे निधन झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीत पप्पू पॉलिस्टरच्या नावाने ओळखले जाणारे प्रसिद्ध विनोदवीर सैयद बदरुल हसन खान बहादूर यांचे निधन झाले. द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान' या मालिकेतील मैसूरचे महाराजाच्या भूमिकेमुळे ते प्रचलित झाले होते.

पप्पू पॉलिस्टर यांनी दरमियान: इन बिच (1997), इत्तेफाक (2001) आणि धुंध: द फॉग (2003) या सिनेमांमध्ये काम केले होते. मागील २५ वर्षांपासून मालिका, चित्रपट, रंगभूमी व जाहिरात या माध्यमांत ते कार्यरत होते.

आपल्या वेगळ्या अभिनय शैलीतून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. हिंदी व्यतिरिक्त उर्दू, पारसी, अरबी, पंजाबी, इंग्रजी, अवधी व भोजपूरी भाषा त्यांना अवगत होती. ते अभिनेत्या व्यतिरिक्त शास्त्रीय नर्तकही होते. त्यांना सर्वोत्कृष्ट शास्त्रीय नृत्यासाठी बिरजू महाराज यांच्याकडून पुरस्कारही मिळाला होता. 

पप्पू पॉलिस्टर यांनी जोधा अकबर, फिर भी दिल है हिंदुस्तानी, मान, खोया खोया चाँद, फरिश्ते, महाराजा, फूल और अंगार, तेरे मेरे सपने, बादल, अन्धा इंतेकाम, तुमसे अच्छा कौन, श्रीमती श्रीमती, आफ मुझे अच्‍छे लगने लगे आणि हीरो हिंदुस्तान यांसारख्या चित्रपटात काम केले होते.