पैशांसाठी फवाद बनला अभिनेता...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 16:09 IST
पैसा कुणाला नको असतो? पण पैशासाठी आपण काय बनावे यावरही आपली विचारसरणी अवलंबून असते. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान म्हणे, ...
पैशांसाठी फवाद बनला अभिनेता...
पैसा कुणाला नको असतो? पण पैशासाठी आपण काय बनावे यावरही आपली विचारसरणी अवलंबून असते. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान म्हणे, ‘केवळ पैशांसाठी अभिनेता बनला आहे. मी फक्त कॉम्प्युटर इंजिनियर होतो. त्यातून माझी कमाई ती काय होणार ? म्हणून मी अभिनेता व्हायचे ठरवले.’मेलबर्न येथील ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘कपूर अॅण्ड सन्स’ ला बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळाला. तेव्हा बोलताना तो म्हणतो,‘ त्या अॅवॉर्डसोबत प्रामाणिक राहून मी हे सांगू इच्छितो की, संपूर्ण जगातील प्रेक्षकवर्ग हा मला केवळ प्रेम आणि आनंदच देत आला आहे.त्यामुळे त्यांचे मी आभार मानू इच्छितो. ’ फवाद आगामी ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्ये रणबीर कपूर, ऐश्वर्या रॉय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत दिसणार आहे.