Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाळिशी पार केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने पुन्हा दाखविले सिक्स पॅक अ‍ॅब्स; हार्ड वर्कआउट करतानाचा व्हिडीओ केला शेअर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 17:16 IST

चाळिशी पार केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपले सिक्स पॅक अ‍ॅब्स दाखविले आहेत. त्याचबरोबर तिने हार्ड वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा उल्लेख इंडस्ट्रीतील त्या अभिनेत्रींमध्ये केला जातो, ज्यांच्या वाढत्या वयाचा त्यांच्या सौंदर्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाही. कारण सुष्मिता वयाच्या ४२व्या वर्षीही २० ते २५ वर्षाच्या तरुणीप्रमाणे दिसते. सध्या सुष्मिता चित्रपटांमधून गायब असून, दोन्ही मुलींच्या पालनपोषणासाठी ती अधिकाधिक वेळ देताना दिसत आहे. त्याचबरोबर ती तिच्या फिटनेसवरही अधिक मेहनत घेत आहे. चाळिशी पार केलेल्या सुष्मिताने काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, ती सध्या सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवित आहे. तिच्या लेटेस्ट फोटोवरून ही बाब स्पष्ट होते की, ती आता तिच्या टार्गेटपर्यंत पोहोचली आहे.  सुष्मिताने बुधवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर तिचे काही स्टनिंग फोटो शेअर केले, ज्यामध्ये ती तिचे अ‍ॅब्स दाखविताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने सांगितले की, मला माझ्या बॉडीवर गर्व वाटत आहे. यावेळी सुष्मिताने तिच्या चाहत्यांना सल्ला देताना सांगितले की, केवळ चांगले दिसणेच सर्वकाही नाही तर स्वत:ला चांगले व्यक्तही करता आले पाहिजे. दरम्यान, सुष्मिताच्या या फोटोला १४ तासांतच दोन लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले.  दरम्यान, मंगळवारी सुष्मिताने पुशअप्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये ती अतिशय हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. हातांंच्या बोटावर आपल्या शरीराचा संपूर्ण भार उचलत पुशअप मारताना ती दिसत आहे. सुष्मिताच्या या व्हिडीओला आतापर्यंत ४.२५ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. वास्तविक सुष्मिता नेहमीच तिच्या फिटनेस आणि वर्कआउट करतानाचे व्हिडीओ आणि फोटोज् शेअर करीत असते.  १९९६ मध्ये ‘दस्तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाºया सुष्मिताने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. तिने ‘बीवी नं.१, मैंने प्यार क्यों किया, मैं हूं न’ आदी सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. तिचा ‘निर्बाक’ हा बंगाली चित्रपटदेखील चांगलाच प्रसिद्धीझोतात राहिला आहे. सध्या सुष्मिता मोठ्या पडद्यावरून गायब असून, तिने लवकरच कमबॅक करावे, अशी तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.