Join us

‘नाम शबाना’च्या पोस्टरवर तापसी पन्नूचा अ‍ॅक्शन अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 16:54 IST

‘पिंक’ फेम तापसी पन्नू हिचा आगामी चित्रपट ‘नाम शबाना’चे पोस्टर अखेर रिलीज झाले. दुस-या कुणी नाही तर खुद्द अक्षय ...

‘पिंक’ फेम तापसी पन्नू हिचा आगामी चित्रपट ‘नाम शबाना’चे पोस्टर अखेर रिलीज झाले. दुस-या कुणी नाही तर खुद्द अक्षय कुमारने आपल्या  twitter अकाऊंटवरून ‘नाम शबाना’चे पहिले पोस्टर रिलीज केले. ‘नाम शबाना’ हा ‘बेबी’ या सिनेमाचा प्रीक्वल आहे, हे तुम्हाला ठाऊक आहेच. पण शिवम नायर दिग्दर्शित ‘नाम शबाना’ हिंदीतील पहिली स्पिन आॅफ मुव्ही आहे,हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. म्हणजेच, ‘बेबी’मध्ये असलेले सगळे कलाकार या चित्रपटातही कॅमिओ वा अन्य भूमिकेत दिसणार आहेत. म्हणजेच, ‘नाम शबाना’ पुन्हा एकदा ‘बेबी’च्या संपूर्ण टीमला घेऊन येणार आहे.  हॉलिवूडमध्ये हा कॉन्सेप्ट कॉमन आहे.   अक्षयने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तापसी अ‍ॅक्शन अवतारात दिसत आहे. ‘ एक महिला केवळ त्याचक्षणी दुर्बल असते, जेव्हा तिची नेलपॉलिश ओली असते,’ असे ‘नाम शबाना’चे पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिलेयं. या चित्रपटासाठी तापसीने बराच घाम गाळलाय. यात ती शबाना कैफ ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. यासाठी तापसीने खास मिक्स्ड मार्शलचे ट्रेनिंग घेतले. फे्रंच स्टंटमॅन सिरिल रफेली या चित्रपटाचा स्टंट डायरेक्टर आहे. शिवाय अब्बास अली खान फाईट इंन्स्ट्रक्टर. त्यामुळे या अ‍ॅक्शन थ्रीलर चित्रपटात आपल्याला जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि मलेशियात शूटींग झालेला हा चित्रपट  येत्या मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटाने ९० कोटींचा गल्ला जमवत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. थ्रीलर चित्रपट शिवाय काहिसे वेगळे टायटल असूनही ‘बेबी’ला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता या चित्रपटाचा प्रीक्वल ‘नाम शबाना’ प्रेक्षकांना किती भावतो, ते बघूच.