Join us  

Sexual Health बाबत अ‍ॅक्शन हिरो विद्युत जामवालचा स्पेशल व्हिडीओ; दिले व्यायामाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 11:11 AM

विद्युत जामवाल आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो.

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये एक धमाकेदार अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख निर्माण केली आहे. विद्युतच्या जवळपास सर्वच सिनेमात बाकी काही असो वा नसो पण धमाकेदार अ‍ॅक्शन असतातच. तो नेहमीच त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्स फॅन्सना नेहमीच आश्चर्यचकित करत असतो.आजपर्यंत त्याच्या सिनेमात चित्रित झालेले सगळेच स्टंट विद्युत जामवलने स्वतःच केले आहेत. त्यामुळेच आज विद्युत जामवाल हा फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव बनला आहे.

काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवलचेही नाव सामिल झाले आहे. खुद्द विद्युतनेच चाहत्यांसह आनंदाजीच बामती शेअर केली होती.त्याने लिहीले होते की,जेव्हा तुम्ही गुगलवर माझे नाव सर्च कराल, तेव्हा माझ्या नावाच्या बाजुला सर्वात्तम मार्शल आर्टिस्ट असे लिहीलेले दिसेल. जगातल्या प्रसिद्ध मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युत जामवालचे नाव सामिल झाल्याने जगभराल्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. 

विद्युत आपल्या रील आणि रिअल लाइफसोबतच सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो.  इतर अभिनेत्यांप्रमाणे तो ही अनेकदा फिटनेस टीप्स चाहत्यांसह शेअर करत असतो.  त्याने नुकताच एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यावेळी त्याने पुरुषांसाठी सेक्शुअल हेल्थबाबतही काही टीप्स दिल्या आहेत. लैंगिक समस्या असणा-या पुरुषांना व्हिडीओच्या माध्यमातून त्याने काही टीप्स दिल्या आहेत. आपल्याकडे आजही या गोष्टीवर मनमोकळेपणाणे बोलले जात नाही.

त्यामुळे विद्युत जामवालने या समस्येने त्रस्त असणा-या लोकांसाठी खास पुढाकार घेतला आहे.व्हिडीओच्या माध्यमातून त्याने एक्सरसाईझचे प्रकार सांगितले आहेत.  निरोगी राहण्यासाठी सेक्शुअल हेल्थ चांगले असणंही तितकेच गरजेचं आहे. त्यामुळे रोज एक एक्सरसाईज केल्याने नक्कीच फायदा होईल असेही त्याने म्हटले आहे. 

टॅग्स :विद्युत जामवाल