‘अभिनय माझा पती, गायन माझा बॉयफ्रेंड’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 11:31 IST
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांनी हॉलीवूडमध्ये मोठी एन्ट्री केली. आलिया भट्टही तिला मिळत असलेल्या भूमिकांचे सोने करत असून ...
‘अभिनय माझा पती, गायन माझा बॉयफ्रेंड’
प्रियंका चोप्रा आणि दीपिका पदुकोन यांनी हॉलीवूडमध्ये मोठी एन्ट्री केली. आलिया भट्टही तिला मिळत असलेल्या भूमिकांचे सोने करत असून त्यांच्याप्रमाणे स्वत:ला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करते आहे. तिलाही आता म्हणे हॉलीवूडमध्ये काम करावयाचे आहे.तसेच नेटफ्लिक्स सारख्या वेबसीरिजमध्येही काम करायचे आहे. तिला लॉलीवूड, टॉलीवूड आणि नॉलीवूड मध्येही तिचे नशीब आजमावायचे आहे. ती म्हणते,‘ हॉलीवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स हिच्याप्रमाणे मला करिअर करायचे आहे.मी तिला आदर्श मानते आणि ती ज्याप्रमाणे निर्णय घेते. आणि प्लॅन्स ठरवते. त्याप्रमाणे मलाही माझे करिअर घडवायचे आहे. तुम्ही असे म्हणू शकता की, अभिनय माझा पती आणि गायन माझा बॉयफ्रेंड आहे. गायन करायला मला प्रचंड आवडते. मी ते नक्कीच करून दाखवणार यात काही शंकाच नाहीये.’