Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सैफ अली खानच्या मते, स्टारकिड्सवर सुंदर दिसण्याचे प्रेशर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 13:22 IST

करिना कपूर जेव्हा केव्हा लाडक्या तैमूरबद्दल बोलते, तेव्हा त्याच्या दिसण्याबद्दल बोलायला ती विसरत नाही. तैमूरच्या लूकची ती कायम प्रशंसा ...

करिना कपूर जेव्हा केव्हा लाडक्या तैमूरबद्दल बोलते, तेव्हा त्याच्या दिसण्याबद्दल बोलायला ती विसरत नाही. तैमूरच्या लूकची ती कायम प्रशंसा करताना दिसते. तैमूर खूप सुंदर आणि गोड आहे, असे त्याच्या जन्मानंतरच ती बोलली होती. यानंतर पुन्हा एकदा ती तैमूरच्या सुंदरतेवर बोलताना दिसली होती. मी अभिमानाने सांगू इच्छिते की, तैमूर अतिशय सुंदर मुलगा आहे. तो माझा मुलगा आहे, म्हणून मी हे बोलत नाहीयं. तर खरोखरीच तैमूर अतिशय देखणा आहे. कदाचित मी प्रेग्नंसीदरम्यान खूप तूप-लोणी खाल्ले, म्हणून तैमूर इतका क्यूट झाला असावा,असे ती बोलली होती. हे सांगायचे कारण, म्हणजे, एकीकडे करिना तैमूरच्या सौंदर्याची तारीफ करताना थकत नाहीय, तर दुसरीकडे तैमूरचे पापा अर्थात सैफ अली खान याला मात्र वेगळेच प्रेशर जाणवू लागले आहे. होय, सध्या मुलांवर सुंदर दिसण्याबद्दल प्रचंड दबाव आहे, असे सैफचे मत आहे.also read :Latest PIC :   तैमूरला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरायला निघाली मॉम करिना कपूर!अलीकडे एका मुलाखतीत, सैफ यावर बोलला. सध्या मुंलांवर सुंदर दिसण्याचे खूप प्रेशर आहे. तैमूर एकमेव नाही तर अनेक स्टारकिड्स हे प्रेशर अनुभवतात. कधीकधी लोक हे प्रेशर आणखीच वाढवतात. काही मीडियाचे लोकही याकडे नको तितके लक्ष देतात. त्यामुळे सामान्य राहणे अनेकदा कठीण होऊन बसते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला. एकंदर काय, तर तैमूरच्या दिसण्यावर लोकांनी नको इतके लक्ष देऊ नये, हेच सैफ बोलता बोलता सुचवून गेला. पण शेवटी तैमूर म्हणजे काही, सामान्य मुलगा नाहीय ना? हँडसम सैफ अली खान आणि ग्लॅमरस करिना कपूर या दोघांचा मुलगा असण्यासोबतच तो पतौडी घराण्याचा छोटा नवाबही आहे. त्याच्याबद्दल लोकांना कुतूहल राहणारच. आता हे सैफला कोण समजवणार?