Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ॠषी कपूरच्या मते; आमिर खान नव्या जमान्याचा ‘राज कपूर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:40 IST

आमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट चाहत्यांकडून व चित्रपट समीक्षकांकडून चांगलीच प्रशंसा मिळवित आहे. बॉक्स आॅफिसवरही ‘दंगल’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. ...

आमीर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट चाहत्यांकडून व चित्रपट समीक्षकांकडून चांगलीच प्रशंसा मिळवित आहे. बॉक्स आॅफिसवरही ‘दंगल’ ब्लॉकबस्टर ठरला आहे. अनेक विक्रमांना तो गवसनी घालणार असा अंदाज ट्रेन्ड अ‍ॅनालिसीस वर्तवित आहेत. ‘दंगल’ पाहिल्यावर ॠ षी कपूर यांनी प्रतिक्रिया देताना आमिर खानची तुलना बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांच्याशी केली आहे. ‘दंगल’ हा चित्रपट पाहिल्यावर बॉलिवूडपासून ते विविध क्षेत्रातील दिग्गजांनी आपले मत नोंदविताना या चित्रपटासोबतच आमिर खानची देखील भरपूर प्रशंसा केली आहे. रामगोपाल वर्मा यांनी तर आमिर खानच्या पायाला स्पर्श करावा असे मत नोंदविले आहे. आमिर खानची प्रशंसा करणाºयांच्या यादीत ॠ षी कपूर यांचाही समावेश झाला आहे. ॠ षी कपूर यांनी ट्विट क रून आमिरची तुलना वडिल राज कपूर यांच्याशी केली आहे. ॠ षी कपूर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले, ‘‘आमिर खानचा दंगल पाहिला, माझ्यासाठी तो नवा राज कपूर आहे, अ‍ॅक्टर, डायरेक्टर, प्रोड्युसर तो आपल्या काळातील शो मॅन आहे. खरोखरच अप्रतिम, गॉड ब्लेस यू!’’आमिर खानला मिळालेल्या या प्रशंसेन तो आनंदी होणार हे नक्की. दंगल हा चित्रपटाने केवळ ८ दिवसांत बॉक्स आॅफिसवर २०० कोटींचा गल्ला पार केला आहे. तो या वर्षातील सर्वाधिक कमाई करणार दुसरा चित्रपट ठरला आहे. सर्वाधिक कमाई करण्याच्या यादीत सुल्तान पाठोपाठ आता दंगलचा समावेश झाला आहे. पहेलवान महावीर सिंग फोगट यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात आमिरची मुख्य भूमिका असून चित्रपटाची कथा त्याच्या मुलीच्या भोवताल गुंफण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून करिना व सैफच्या मुलाच्या नावावरून कान टोचणाºया ॠ षी कपूर यांच्या ट्विटमुळे त्यांच्या व आमिरच्या चाहत्यांना आनंद झाला असेल. }}}}