मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. या वयातही इतकी फीट असलेली शिल्पा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ती अनेकदा दिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. पण, आता शिल्पाने एक वेगळाच फोटो शेअर केला आहे. तिचा फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
शिल्पाने नुकताच शेअर केलेला फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. शिल्पा शेट्टीचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिचा तुटलेला पाय दाखवताना दिसत आहे. तसेच, ती हॉस्पिटलमध्ये एका व्हील चेअरवर बसलेली दिसतीय. शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा फोटो शेअर केला आहे. यात ती हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना ती लिहिते- 'रोल कॅमेरा अॅक्शन झाली आणि माझा पाय मोडला. मी याला गांभीर्याने घेतले होते. पण, आता मी 6 आठवडे कोणतीही कृती करू शकणार नाही. जेव्हा परत येईल तेव्हा मी पूर्वीपेक्षा चांगली असेल. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा.' शिल्पाचा हा फोटो पाहून चाहते चकित झाले. तसेच, शिल्पाच्या तब्येतीसाठी प्रार्थनाही केली.