Join us  

चिमुकल्या अबरामचा बिग बींना थेट सवाल; वाचून तुम्हीही पडाल विचारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 5:55 PM

पडद्यावर भाऊ-बहीण, वडील-मुलगा असं नातं निभावणाऱ्या  कालाकार मंडळींचा प्रत्यक्षातही ऋणानुबंधन असल्याचं भास अनेकवेळा होतो. असाच काहीसा भ्रम शाहरुखच्या लहानग्या अबरामला झाला असून तो अभिनेता आमिताभ बच्चन यांना आजोबा समजत आहे.

अमिताभ बच्चन यांची नात आराध्याचा नुकताच वाढदिवस सेलिब्रेट करण्यात आला असून या पार्टीमध्ये अनेक सेलिब्रेटी किडने हजेरी लावली होती. यावेळी छोटा अबराम देखील आला होता. विशेष म्हणजे तो अमिताभ यांना शाहरुखचे वडील समजत असून ते आपल्यासोबत का राहत नाही असा निरागस प्रश्न त्याने उपस्थित केल्याचं खुद्द बिग बींनी सांगितलं.

चित्रपटसृष्टीमध्ये मुक्त वावर असणारे कलाकार आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. भूमिका वास्तवात खरी वाटावी यासाठी अनेक वेळा कलाकार ती भूमिका जगत असतात. त्यामुळे पडद्यावर भाऊ-बहीण, वडील-मुलगा असं नातं निभावणाऱ्या  कालाकार मंडळींचा प्रत्यक्षातही ऋणानुबंधन असल्याचं भास अनेकवेळा होतो. असाच काहीसा भ्रम शाहरुखच्या लहानग्या अबरामला झाला असून तो अभिनेता आमिताभ बच्चन यांना आजोबा समजत आहे.

अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अबराम आणि श्वेता नंदा दिसून येत आहे. ‘शाहरुखचा हा लहानगा अबराम मला त्याचे अजोबा समजतो. मीच शाहरुखचा वडील आहे असा त्याचा समज आहे. त्यामुळे जर मी खरंच शाहरुखचा बाबा असेन तर मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी का राहत नाही असा प्रश्न त्याला पडला आहे,’ असं बिग बीने शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे अमिताभ -शाहरुख यांच्यात वडील- मुलाचं नातं असल्याचं अबराम समजतो. त्यामुळेच त्याने हा निरागस प्रश्न विचारल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चन