अबब...‘फोर्स २’साठी जॉनने उचलली कार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:34 IST
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’ चित्रपटात जॉन अब्राहमने १५० किलो वजनाची बाईक उचलली होती. आता हेच काय कमी होतं ...
अबब...‘फोर्स २’साठी जॉनने उचलली कार?
२०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फोर्स’ चित्रपटात जॉन अब्राहमने १५० किलो वजनाची बाईक उचलली होती. आता हेच काय कमी होतं का की, आता त्याने ‘फोर्स २’साठी १५८० किलो वजनाची मर्सिडीज बैंझ उचलली आहे. विपुल अमृतलाल शाह याने ‘फोर्स २’ची घोषणा केल्यावरच चाहत्यांना त्याच्या अशा स्टंटची प्रतीक्षा होती.‘फोर्स’मध्ये त्याने उचलली बाईक हाच चित्रपटाचा यूएसपी पॉर्इंट बनला होता. बाईक उचलल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चर्चा होती की, कदाचित हा एक स्टंट असू शकतो. ट्रिक फोटोग्राफी किंवा मशीनने बाईक उचलण्याचा प्रयत्न याला म्हणता येऊ शकते, असे म्हटले जात होते. पण, नाही हे खरंय की त्याने चित्रपटासाठी मर्सिडीजही उचलली आहे.