Join us

अमिताभ बच्चन यांनी सगळ्यांसमोर पत्नी जया यांना केले होते Kiss, पाहून अभिषेक झाला होता हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2020 11:33 IST

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात ते दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरात कैद आहेत. अशात सेलिब्रेटींशी निगडीत स्टोरी, किस्से, थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ पहायला मिळत आहे. यादरम्यान अमिताभ बच्चनजया बच्चन यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात ते दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चनजया बच्चन यांच्या लग्नाचा 47वा वाढदिवस नुकताच पार पडला. ही गोष्ट आहे 2014 सालातील स्टार स्क्रीन पुरस्कार सोहळ्या दरम्यानची.

ज्यावेळी अमिताभ बच्चन यांना लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अमिताभ बच्चन जेव्हा पुरस्कार घेऊन मंचावरून ते सरळ त्यांची फॅमिली बसली होती तिथे आले. मग त्यांनी पत्नी जया बच्चन यांच्याशी बोलताना सर्वांसमोर किस केले.

यावेळी मुलगा अभिषेक बच्चन त्या दोघांच्या मध्ये बसला होता. ते दोघे एकमेकांसोबत लिपलॉक करत होते. आई वडिलांना अशा पद्धतीने किस करताना पाहून अभिषेक बच्चन हैराण झाला होता.

अभिषेकची रिएक्शन पाहून अमिताभ बच्चन यांनी त्यालाही मिठी मारली आणि स्वतः हसू लागले.

टॅग्स :अमिताभ बच्चनजया बच्चनअभिषेक बच्चन