अभिषेक बच्चन आतुरतेने वाट पाहातोय या गोष्टीची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 12:31 IST
बॉलिवूडचा कॉरियोग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवा ज्युनिअर बच्चनला घेऊन चित्रपट तयार करतोय. या चित्रपटाचे नाव लिफ्टी आहे. अभिषेक बच्चनची ...
अभिषेक बच्चन आतुरतेने वाट पाहातोय या गोष्टीची...
बॉलिवूडचा कॉरियोग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवा ज्युनिअर बच्चनला घेऊन चित्रपट तयार करतोय. या चित्रपटाचे नाव लिफ्टी आहे. अभिषेक बच्चनची या चित्रपटात मुख्य भूमिका असणार आहे. लिफ्टीमध्ये अभिषेक जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट पण तयार आहे तसेच अभिषेकने या चित्रपट करण्यासाठी होकारही दिला आहे. मात्र या चित्रपटाची पटकथा दमदार असायला हवी अशी अट अभिषेक बच्चनने ठेवली आहे. सध्या स्थितीत अभिषेकच्या करिअरला एका हिट चित्रपटाची गरज आहे. गेल्या काही दिवसात अभिषेक मल्टीस्टारर चित्रपटात दिसला होता आता मात्र त्याला आता एक सोलो हिटची गरज आहे. पुढच्या वर्षी लिफ्टीचे शूटिंग सुरु होणार आहे, प्रभू देवाला त्याच्या इतर चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा हिट करायचा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या एक्शन चित्रपटात मसाला असेल पण डान्सला तेवढे महत्त्व दिले जाणार नाहीये. साजिद नाडियाडवाला निर्मिती हाऊसफुल 3 या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख बरोबर अभिषेक बच्चनने स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटाने 100 कोटींचा बिझनेसदेखील केला होता. मात्र याचे सारे श्रेय अक्षय कुमारला गेले त्यामुळे आता अभिषेकला प्रतिक्षा आहे एका सोलो हिटची. त्यामुळे अभिषेकला करिअरमध्ये कमबॅक करण्यासाठी लिफ्टी चित्रपटाची मदत होईल. प्रभू देवाने याआधी साऊथमध्ये अनेक दमदार हिट चित्रपट तयार केले आहे. सलमान खानला ही वॉन्टेड या चित्रपटातून अपार लोकप्रियता प्रभू देवाने मिळवून दिली होती. त्याच हिटची आशा बहुधा अभिषेक पण करत असले.