Join us

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू, विकी कौशल स्टारर ‘मनमर्जियां’चा ट्रेलर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 11:47 IST

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल स्टारर ‘मनमर्जियां’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालायं. 

अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशल स्टारर ‘मनमर्जियां’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालायं. अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘मनमर्जियां’चा ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची तुमची उत्सुकता कित्येकपटींनी वाढेल, हे सांगायला नकोच. ‘सूरमा’ आणि ‘मुल्क’नंतर तापसी पन्नू पुन्हा एकदा यात बिनधास्त अंदाजात दिसतेय.

 ट्रेलर बघता, हा चित्रपटात एक प्रेमत्रिकोण दिसणार, असे दिसतेय. ट्रेलरची सुरूवातचं मजेशीर आहे. तापसी व विकी कौशलच्या किसींग सीनने ट्रेलरची सुरूवात होते. या चित्रपटात तापसीने रूमी नावाच्या एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. विक्की तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. पण लग्न आणि जबाबदाऱ्या त्याला नको असतात. मग यात अभिषेकची एन्ट्री होते. रॉबी नावाच्या पंजाबी मुलाची भूमिका त्याने यात साकारली आहे. रूमीसोबत अरेंज मॅरेज करण्यासाठी रॉबी तयार असतो.

 ट्रेलरमध्ये तिन्ही कलाकारांचा अभिनय बघण्यासारखा आहे. तुम्हीही हा ट्रेलर बघा आणि कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा.

टॅग्स :तापसी पन्नू