Join us

अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 11:10 IST

शोएब अख्तरने अभिषेक शर्माचा उल्लेख अभिषेक बच्चन म्हणून केला. त्यामुळे अभिनेत्याने दोन वाक्यात शोएबची चांगलीच शाळा घेतली आहे. जाणून घ्या

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक २०२५ (Asia Cup 2025) फायनल सामन्यापूर्वी शोएब अख्तरला बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने चांगलाच टोला लगावला. याशिवाय पाकिस्तानी क्रिकेट संघाची चांगलीच शाळा घेतली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने एका लाईव्ह टीव्ही शोमध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माच्या नावाऐवजी चुकून अभिषेक बच्चनचं नाव घेतल्यामुळे ही घटना घडली. जाणून घ्या

शोएब अख्तरकडून झाली चूक

'गेम ऑन है' (Game On Hai) नावाच्या एका क्रिकेट टॉक शोमध्ये शोएब अख्तर पाकिस्तानच्या फायनलमधील संधींवर विश्लेषण करत होता. त्यावेळी अभिषेक शर्माचा उल्लेख करताना, चुकून त्याने बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचं नाव घेतलं. अख्तर म्हणाला, "जर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर आऊट केलं, तर त्यांच्या मधल्या फळीचं काय होईल? त्यांचे मधले बॅट्समन चांगले खेळलेले नाहीत." अख्तरने हे म्हणताच शोमधील इतर सदस्य हसू लागले आणि त्यांनी लगेच त्याला चूक सुधारण्यास सांगितली, की तो अभिषेक शर्माबद्दल बोलत आहे. ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली.

अभिषेक बच्चनचा खास रिप्लाय

ही व्हायरल व्हिडिओ क्लिप अभिषेक बच्चनने पाहिली. अभिषेकने आपल्या खास विनोदी शैलीत यावर प्रतिक्रिया दिली की, "सर, मी तुमचा आदर करतो...  पण मला नाही वाटत की त्यांना तेही जमेल! आणि मी तर क्रिकेट खेळण्यात अजिबात चांगला नाहीये." अभिषेक बच्चनच्या या मिश्किल उत्तरामुळे नेटकऱ्यांना हसू आवरलं नाही आणि त्यांनी अभिनेत्याचं कौतुक केलं. अशाप्रकारे शोएब अख्तरची क्लीप आणि त्यावर अभिषेक बच्चनने दिलेला रिप्लाय, चांगलाच व्हायरल झाला आहे.

अभिषेक शर्माचे उत्कृष्ट प्रदर्शन

येत्या रविवारी (२८ सप्टेंबर) दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धकांमध्ये आशिया चषकाचा फायनल सामना होणार आहे. या सामन्यासाठी शोएब अख्तरने भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला लवकर बाद करणे, हीच पाकिस्तानची सर्वात मोठी रणनीती असेल, असं म्हटलं आहे. आशिया चषकात अभिषेक शर्माने जबरदस्त फॉर्म दाखवला आहे, त्याने सलग दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shoaib Akhtar confuses Abhishek Sharma with Bachchan; gets witty reply.

Web Summary : Shoaib Akhtar mistakenly mentioned Abhishek Bachchan instead of Abhishek Sharma during a cricket show. Bachchan responded humorously, doubting Pakistan's ability to dismiss him and admitting his poor cricket skills. Sharma is performing well in Asia Cup 2025.
टॅग्स :अभिषेक बच्चनअभिषेक शर्माशोएब अख्तरऑफ द फिल्ड