Join us

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चनचा ‘हा’ फोटो बघून चाहते झाले रोमांचित!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 22:13 IST

अभिषेक आणि ऐश्वर्याने एका रिसेप्शनमध्ये हजेरी लावली असता, त्याठिकाणी हा फोटो काढण्यात आला आहे. फोटोमध्ये दोघांची बॉँडिंग स्पष्टपणे दिसत आहे.

अभिनेता अभिषेक बच्चन आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांचा एक असा फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये या दोघांमधील स्ट्रॉँग बॉँडिंग स्पष्टपणे बघावयास मिळत आहे. खरे तर यात काहीही शंका नाही की, अभिषेक आणि ऐश्वर्या बॉलिवूडमधील सर्वाधिक पॉप्युलर कपल आहे. या दोघांना एकत्र बघणे त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच कुतुहलाचा भाग राहिला आहे. दोघांचे लग्न होऊन आता बरीच वर्षे झाली आहेत. अशातही जेव्हा हे दोघे एकत्र बघावयास मिळतात, तेव्हा सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या काही दिवसांपूर्वीच एका वेडिंग रिसेप्शनमध्ये गेले होते. त्याठिकाणी या दोघांमधील स्ट्रॉँग केमिस्ट्री स्पष्टपणे दिसत होती. दोघांनी रिसेप्शनचे निमित्त साधून एक फोटो काढला. सध्या हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केला जात आहे. फोटोमध्ये अभिषेक निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे. तर ऐश्वर्याने पारंपरिक लाल रंगाचा लेहंगा घातला आहे. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये ऐश्वर्याचे रूप खूपच खुलून दिसत आहे. तर अभिषेकलाही त्याचा ड्रेस शोभून दिसत आहे. दोघांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर --- या नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. काही तासांपूर्वीच शेअर करण्यात आलेल्या या फोटोला आतापर्यंत १५ हजार ९३० लाइक्स मिळाले आहेत. पुढच्या काही तासांमध्ये लाइक्सची संख्या लाखाच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.  दरम्यान, ऐश्वर्या लवकरच ‘फन्ने खां’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अनिल कपूर आणि राजकुमार राव प्रमुख भूमिकांमध्ये बघावयास मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, पुढच्या वर्षी हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर वृत्तानुसार लवकरच अभिषेक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘गुस्ताखियां’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटासाठी अभिषेकचे नाव निश्चित झाल्याचे समजते.