Join us  

श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? बर्थडे बॅशमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन कुटुंबाची सून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 10:05 AM

रविवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबीय एका शानदार सोहळ्याची तयारी करताना दिसले.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांची लाडकी लेक श्वेता बच्चन हिने 17 मार्च ला तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी तिच्यावर बॉलिवूडमधील अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.  श्वेताच्या 50व्या वाढदिवसानिमित्त बच्चन कुटुंबियांनी संध्याकाळी एक नाशदार पार्टी देण्यात आली.  या वाढदिवसाच्या पार्टीच्या फोटोंमध्ये ऐश्वर्या दिसली नाही, त्यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे का?

रविवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबीय एका शानदार सोहळ्याची तयारी करताना दिसले. श्वेताची लेक नव्यासोबत करण जोहर सजावटीत मदत करताना दिसला. तसेच नव्या नंदाचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धांत चतुर्वेदीही श्वेता बच्चनच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहचला होता. मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनीही हजेरी लावली होती.  शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानही या पार्टीत सहभागी झाल्या होत्या.  मात्र तरीही पार्टीत बच्चन कुटुंबाचा लाडका लेक अभिषेक,  ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन हे अनुपस्थित होते. त्यांचे पार्टीला न येणे हे चर्चेचा विषय ठरला.

आता सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की श्वेताच्या या खास दिवशी ऐश्वर्या आणि अभिषेक कुठे होते. पार्टीतील फोटोंवर बहुतेक चाहत्यांनी 'ऐश्वर्या आणि अभिषेक कुठे आहे?' आणि आराध्या कुठे आहे?' अशा कमेंट केल्या आहेत. श्वेतावर ऐश्वर्या नाराज असल्याचं बोललं जात आहे. मात्र बच्चन कुटुंब, अभिषेक किंवा ऐश्वर्या कोणीच त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही, मौनही सोडले नाही. थोडे दिवसांपूर्वी अंबानींच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये सगळे एकत्र दिसले होते. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनसेलिब्रिटीसिनेमाअभिषेक बच्चनअमिताभ बच्चनजया बच्चन