Join us

काम मिळत नाही, पैसे कमवण्यासाठी अभिनेता झाला डीजे? नाइट क्लबमधील Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 10:51 IST

"देओल"मधील 'D' म्हणजे DJ! लोकप्रिय अभिनेत्याचा नाइट क्लबमधील व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अभय देओल आपल्या हटके अभिनय शैली आणि व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जातो. त्याच्या अभिनयाची आणि स्टाईलची चाहते कायमच प्रशंसा करत असतात. स्टार कीड असला तरी मेहनतीच्या जोरावर, संघर्ष करत त्याने स्वत:ला सिद्ध केलं होतं.  मात्र, गेल्या काही काळापासून अभय मोठ्या पडद्यावर दिसलेला नाही. अभय देओल सध्या अभिनय करत नसला, तरी तो चर्चेत मात्र आहे. कारण त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अभय हा डीजेच्या अवतारात दिसत आहे.

अभय देओल १६ मे रोजी गुरुग्राममधील एका नाइटक्लबमध्ये अभयने डीजे म्हणून परफॉर्म केलं आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तो ट्रॅक्स प्ले करताना आणि सिगरेट ओढताना दिसतोय. त्याच्या या हटके अंदाजाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अभय देओलने स्वतःच्या सोशल मीडिया हँडल्सवर हा व्हिडीओ अजून शेअर केलेला नाही, पण अनेकांनी हा व्हिडीओ पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.

पैसे कमवण्यासाठी नाही, तर संगीत प्रेमापोटी अभय डीजे बनला होता. अभयच्या या डीजे व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या. अनेकांनी त्याची तुलना भाऊबॉबी देओलशी केली. एकाने कमेंट केली, "'देओल' या आडनावातील 'D' म्हणजे DJ असं वाटायला लागलंय आता!" तर दुसऱ्याने लिहिलं, "तो लॉर्ड DJ बॉबीचा शिष्य आहे, त्यानं सर्वोत्तम शिक्षकाकडून धडे घेतलेत". २०१६ मध्ये बॉबी देओल दिल्लीतील एका नाइटक्लबमध्ये डीजे म्हणून गाणी वाजवताना दिसला होता.

Ariana, what are you doing here 🤤byu/Odd-Concern4264 inBollyBlindsNGossip

अभय देओलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो नेहमीच हटके आणि अर्थपूर्ण चित्रपट निवडताना दिसून आला आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा', 'देव डी', 'शांघाय', 'रांझणा' यांसारख्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो शेवटचा नेटफ्लिक्सवरील 'ट्रायल बाय फायर' या वेबसीरिजमध्ये दिसला होता. त्याला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :अभय देओल