Join us

ABCD 2 मधील वरुणची अभिनेत्री लॉरेन 'या' निर्मात्याला करतीये डेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:46 IST

ABCD आणि ABCD 2 या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री सध्या एका निर्मात्याला डेट करत असल्याची माहिती समोर येतीये.

मुंबई : आपल्या जबरदस्त डान्सने बॉलिवूडकरांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणारी अभिनेत्री-डान्सर लॉरेन गॉटबिल ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. ABCD आणि ABCD 2 या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री सध्या एका निर्मात्याला डेट करत असल्याची माहिती समोर येतीये.

रेमो डिसुझा याच्या ABCD आणि ABCD 2 या सिनेमांमध्ये दिसलेली ही अभिनेत्री एका डान्स रिअॅलिटी शोमधून लोकप्रिय झाली होती. त्यानंतर रेमोनेच तिला या सिनेमांमध्ये संधी दिली. आता लॉरेन सध्या निर्माता बेंजामिन डेव्हिड हॉफमन याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. हा हॉलिवूड आणि ब़ॉॉ

खरंतर लॉरेनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही दोघांचे काही फोटो शेअर केले असून त्यातून दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरु असल्याची कुजबूज बॉलिवूडमध्ये होत आहे. पण दोघांनीही याबाबत काहीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाहीये. पण खरंतर त्यांचे फोटो पाहून त्यांनी काहीही सांगण्याची गरज दिसत नाही.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटी