Join us  

 ‘आश्रम 2’वर बंदी घाला! करणी सेना मैदानात, दिग्दर्शक प्रकाश झा म्हणाले...

By रूपाली मुधोळकर | Published: November 06, 2020 11:17 AM

करणी सेनेने ‘आश्रम 2’ या वेबसीरिजवर आक्षेप घेतला असून दिग्दर्शक प्रकाश झा यांना लीगल नोटीस बजावले आहे.

ठळक मुद्दे ‘आश्रम 2’मध्ये बॉबी देओल लीड रोलमध्ये आहे. याशिवाय चंदन रॉय, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉबी देओल स्टारर वेबसीरिज ‘आश्रम’चा पहिला सीझन चांगलाच गाजला होता. या सीझनमधील बॉबीच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. लवकरच या वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘आश्रम 2’ प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या ‘आश्रम 2’चा ट्रेलर रिलीज झाला. मात्र याचदरम्यान ‘आश्रम 2’ने एक वाद ओढवून घेतला. करणी सेनेने या वेबसीरिजवर आक्षेप घेतला असून दिग्दर्शक प्रकाश झा यांना लीगल नोटीस बजावले आहे. ‘आश्रम 2’चा ट्रेलर आणि ही संपूर्ण वेबसीरिजच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करणी सेनेने केली आहे.ही सीरिज हिंदूंच्या भावना दुखावणारी आहे. येणा-या पिढीला हिंदू धर्माची नकारात्मक प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ट्रेलरमध्ये हिंदू संस्कृती, परंपरांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे, असा आरोप महाराष्ट्राच्या करणी सेनेने केला आहे.

आश्रम या वेबसीरीजमध्ये प्रकाश झा ने ढोंगी बाबाची कथा मांडली होती. एक हिंदू ढोंगी बाबा लोकांना कसा लुटतो ते या मालिकेत दाखवले होते. ही वेबसीरीज प्रेक्षकांना आवडली होती. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद पाहून सीरिजचा दूसरा सीझन घेऊन येण्याचे प्रकाश झा  यांनी ठरवले होते. त्यानुसार 11 नोव्हेंबरपासून ‘आश्रम 2’ ही वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे. मात्र याचा पहिला टीझर प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर प्रकाश झा यांच्या अटकेची मागणी सुरु झाली होती.टीझर प्रदर्शित झाल्याबरोबर प्रकाश झा हिंदूंची बदनामी करीत असल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यामुळेच सोशल मीडियावर #Arrest_Prakash_Jha ट्रेंड होऊ लागला होता.  ‘आश्रम 2’मध्ये बॉबी देओल लीड रोलमध्ये आहे. याशिवाय चंदन रॉय, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयंका, अध्ययन सुमन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

प्रकाश झा म्हणतात,करणी सेनेच्या मागणीवर निर्णय घेणारा मी कोण आहे? आमच्या सीरिजच्या पहिल्या सीझनला 400 मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. माझ्या मते, नकारात्मक प्रतीमा निर्माण करण्याचा निर्णयही प्रेक्षकांवर सोडायला हवा. आपण हा निर्णय लोकांवर सोडू शकतो काय? असा सवाल या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश झा यांनी केला आहे. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

या अभिनेत्रीवर जीवापाड प्रेम करायचा बॉबी देओल, केवळ धर्मेंद्र यांच्यामुळे होऊ शकले नाही लग्न !

टॅग्स :प्रकाश झाबॉबी देओल