Join us

अरिजितच्या आवाजातील ‘इश्क मुबारक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:57 IST

या गाण्याचा विशेषत: म्हणजे अरिजित सिंगचा आवाज आहे. अंकित तिवारीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंगने पूर्ण न्याय दिला आहे. यावेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृ ष्ठ लव्ह साँग असल्याचे नेहा शर्मा सांगते.

‘कोई फरियाद’ हे गाणे रिलीज झाल्यानंतर ‘तुम बिन 2’चे नवे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘तुम बिन’ प्रमाणेच या नव्या चित्रपटातील गाणेही श्रवणीय आहेत. ‘तुम बिन 2’चे अरिजित सिंगच्या आवाजातील ‘इश्क मुबारक’ हे नवे गाणे रिलीज करण्यात आले आहे. 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘तुम बिन’चा सिक्वल तुम बिन नावाने लवकरच प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटातील गाण्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. नेहा शर्मा आणि आदित्य सील यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘इश्क फरियाद’ हे रोमाँटिक साँग आहे. ‘तुम बिन 2‘मध्ये नेहा शर्मा, आदित्य सील व आश्मी गुलाटी यांचा प्रेम त्रिकोण दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या गाण्याचा विशेषत: म्हणजे अरिजित सिंगचा आवाज आहे. अंकित तिवारीने संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अरिजित सिंगने पूर्ण न्याय दिला आहे. यावेळी बॉलिवूडमधील सर्वोत्कृ ष्ठ लव्ह साँग असल्याचे नेहा शर्मा सांगते. ">http://