Join us

कॅमेरे बघताच काहीशी निराश झाली आराध्या बच्चन; मग असे घडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 22:14 IST

हल्ली सेलिब्रिटीच्या घरात जन्माला येणे सोपे नाही. कारण तुम्ही कुठेही गेला तरी, मीडियाचे कॅमेरे तुमच्या दिशेने वळतातच. विशेष म्हणजे ...

हल्ली सेलिब्रिटीच्या घरात जन्माला येणे सोपे नाही. कारण तुम्ही कुठेही गेला तरी, मीडियाचे कॅमेरे तुमच्या दिशेने वळतातच. विशेष म्हणजे मोठ्या स्टारपेक्षा त्यांच्या मुलांची झलक कॅमेºयात कैद करण्यात जास्त स्वारस्य दाखविले जात असल्याने मुलांना पब्लिक प्लेसमध्ये घेऊन फिरणे त्या स्टार्ससाठी मोठी कसरत करण्याप्रमाणे असते. खरं तर सर्वसामान्यांना या स्टार्स किड्सची अधिक क्रेझ असल्यानेच त्यांचे फोटोज् लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही सर्व धडपड असते. असो, यावेळेस ऐश्वर्या राय-बच्चन हिची चिमुकली आराध्या विमानतळावर स्पॉट झाली अन् तिला कॅमेºयांचा सामना करावा लागला. काल रात्री आराध्या आई ऐश्वर्या राय-बच्चनबरोबर मुंबई विमानतळावर उतरली. विमानतळाबाहेर येताच तिला माध्यमांनी घेरले. काहीही न सांगता बºयाचशा कॅमेºयांमध्ये ऐश्वर्या आणि तिच्या मुलीचे फोटो काढले जात होते. मात्र ही बाब आराध्याला फारशी आवडली नसावी. कारण ती फोटो काढणाºयाकडे बघताना फारशी आनंदी दिसत नव्हती. फोटोमध्ये जर तुम्ही आराध्याच्या चेहºयाचे निरीक्षण केल्यास तुमच्या ही बाब लगेचच लक्षात येईल. खरं तर पहिल्यांदाच आराध्या माध्यमांसमोर आली, असे अजिबात नाही. यापूर्वीदेखील तिने बºयाचदा पब्लिक एपीयरेंस केला आहे. त्यावेळी तिने मीडिया अटेंशनही एन्जॉयही केला आहे. मात्र यावेळेस आराध्या फारशा मूडमध्ये दिसत नव्हती. कदाचित रात्र अधिक झाल्याने तिला झोप लागत असावी. मुलीची स्थिती लक्षात घेऊन आई ऐश्वर्यानेदेखील लगेचच तेथून काढता पाय घेतला.