Join us

बॉलीवुडची क्वीन आमिरच्या पत्नीला का करतेय कॉपी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2016 12:28 IST

एखाद्याचं मन जिंकण्यासाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही.आपल्या अभिनयाने बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौतने रसिकांची मनं तर जिंकलीत. मात्र ...

एखाद्याचं मन जिंकण्यासाठी सेलिब्रिटी काय करतील याचा नेम नाही.आपल्या अभिनयाने बॉलीवुडची क्वीन कंगणा राणौतने रसिकांची मनं तर जिंकलीत. मात्र मिस्टर पर्फेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानवरही तिच्या अभिनयाची जादू पाहायला मिळतेय. त्यामुळंच की आमिरनं जाहीररीत्या कंगणाच्या क्वीनमधील अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. आता आमिरपाठोपाठ बॉलीवुडच्या या क्वीनने मिसेस आमिर खान अर्थात किरण रावचं मन जिंकायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळंच की काय एका सिनेमाच्या स्क्रीनिंगला कंगणा चक्क किरण रावच्या अंदाजात अवतरली होती. प्रत्येक पार्टीला कंगणा वेगवेगळ्या अवतारात जाते हे एव्हाना सा-यांनाच माहिती झालंय. मात्र किरण रावसारखा हुबेहूब कंगणाचा अवतार सा-यांच्या नजरा आकर्षित करत होता.कर्ल हेअरस्टाईल, डोळ्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा, आणि ड्रेसिंगस्टाईलसुद्धा अगदी किरण रावप्रमाणेच. आता किरण रावसारखा लूक करुन बॉलीवुडच्या या क्वीनला तिचं मन जिंकायचं असचं दिसतंय.