Join us

​आमिरच्या प्रेग्नेंट करीनाला टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 14:45 IST

करीना कपूर ही सध्या प्रेगे्रट असल्याने खूप व्यस्त आहे. सैफ अली खानने  ही  बातमी दिल्यापासून करीनाला खूप शुभेच्छा येत ...

करीना कपूर ही सध्या प्रेगे्रट असल्याने खूप व्यस्त आहे. सैफ अली खानने  ही  बातमी दिल्यापासून करीनाला खूप शुभेच्छा येत आहेत. मुंबईमध्ये अलीकडे ती एका जाहीरात चित्रपटाची शुटींग करीत होती. बाजूचाच हॉलमध्ये आमिर खान सुुद्धा दुसºया एका जाहीरात चित्रपटाचीच शुटींग करत होता. आमिरला जेव्हा करिना येथे आल्याचे कळाले तेव्हा तो तिला भेटण्यासाठी जाऊन, बराच वेळ  त्यांच्या गप्पा झाल्या. सूत्रांनी सांगितले की, यामध्ये आमिरने करिना  ही प्रेग्नेंट असल्याने खास टिप्स दिल्या आहेत. या काळामध्ये आरोग्यवर्धक पदार्थाचे सेवन करायचे. करीनाला कॉफी पिण्याची सवय अधिक आहे. परंतु, आमिरने तिला या काळात कॉफी बिलकुल न घेण्याचा सल्ला दिला. आमिर खान  हा तीन मुलाचा पालक आहे. त्यामुळे प्रेग्नेंसीच्या काळात महिलांनी काय खावे, काय खावू नये या सर्व  गोष्टी त्याला माहिती आहेत. तसेच आमिर हा सध्या त्याची येणारा दंगल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यामध्ये तो एका पहिलवानाची भूमिका साकारत आहे. त्याकरिता त्याने आपल्या बॉडीवर विशेष लक्ष  केंद्रीत केले आहे. ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.