आमिरच्या ‘फॅट टू फिट’ व्हिडीओने चाहते प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 18:55 IST
याशिवाय त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला वजन कमी करण्याच्या व्हिडीओला देखील चाहत्यांनी विशेष पसंती दर्शवली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मपासून ते सर्वत्र आमिर खानच्या वजन घटवण्याचीच चर्चा आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ एवढा आवडतोय की, ते त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करत आहेत.
आमिरच्या ‘फॅट टू फिट’ व्हिडीओने चाहते प्रभावित
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा चित्रपट २३ तारखेला रिलीज होणार आहे. आत्तापासूनच दंगलचे ट्रेलर, गाणी यांनी रेकॉर्ड बनवला आहे. याशिवाय त्याचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला वजन कमी करण्याच्या व्हिडीओला देखील चाहत्यांनी विशेष पसंती दर्शवली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मपासून ते सर्वत्र आमिर खानच्या वजन घटवण्याचीच चर्चा आहे. चाहत्यांना त्याचा हा व्हिडिओ एवढा आवडतोय की, ते त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर करत आहेत. आमिरच्या वजन कमी करण्याच्या व्हिडीओ शेअरिंगची चर्चा कमी होती का की, आता त्याला टिप्स मागण्यासाठीही चाहते त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. फोन, पत्रे आणि ईमेल पाठवून आमिर खानकडून टिप्स मागवून घेत आहेत. या प्रश्नांमध्ये विशेषत्वाने खाण्यापिण्याच्या पद्धती, कामाचे स्वरूप, विशेष काळजी याबाबतीत प्रश्नांचा जास्त कल होता. आमिरने केवळ २५ आठवड्यात ९२ किलोग्रामवरून वजन कमी करून ७२ किलो केले आहे. या व्हिडीओत तो वजन कमी करण्यासाठीचे व्यायाम आणि बॉडीला शेपमध्ये आणण्यासाठी विविध प्रकारच्या व्यायामांची ट्रेनिंग त्याने घेतली आहे. ही त्याची मेहनत पाहून त्याच्यावर चाहतेमंडळी फिदा झाली आहेत. ">http:// पहेलवान महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित ‘दंगल’ या बायोपिकमध्ये आमिर खान महावीर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे. चित्रपट २३ डिसेंबरला रिलीज होणार असून चाहत्यांना चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागली आहे.