आजारी चाहत्याच्या भेटीला आमिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 07:22 IST
बॉलिवूड स्टार्सचे अनेक डायहार्ड फॅन असतात. आपल्या आवडत्या सेलिबे्रेटीसाठी काहीही करण्यासाठी ते तयार असतात. मात्र, त्यांची एक झलक पाहण्याची, त्यांच्याशी ...
आजारी चाहत्याच्या भेटीला आमिर
बॉलिवूड स्टार्सचे अनेक डायहार्ड फॅन असतात. आपल्या आवडत्या सेलिबे्रेटीसाठी काहीही करण्यासाठी ते तयार असतात. मात्र, त्यांची एक झलक पाहण्याची, त्यांच्याशी दोन शब्द बोलण्याचे भाग्य सर्वांनाच मिळते असे नाही. त्यासाठी ते मायानगरी मुंबईला ठाण मांडून बसतात. निहाल बिटला या मुलालासुद्धा आमिर खानला भेटण्याची इच्छा होती. आमिरचा सर्वात मोठा चाहता असे तो स्वत:ला म्हणवतो. परंतु दु:खाची गोष्ट म्हणजे तो ‘प्रोजेरिआ’ या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. ऐन बालपणातच वार्धाक्य येणारा हा रोग. ट्विटरवर जेव्हा निहालने आमिरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे आमिरही त्याला भेटायला गेला. 'दंगल'च्या शुटिंगमध्ये व्यस्त असला तरी त्याने वेळ काढून निहालची भेट घेतली. आनंदाने ऊर भरून आलेल्या निहालने आमिर सांगितले की, ‘अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेतील 'पा' हा चित्रपट पाहून अतिशय दु:ख झाले. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लोक मला ओरो या नावाने चिडवत होते. मात्र 'तारे जमीन पर' या चित्रपट पाहिल्यावर माझ्या मनात नवी आशा निर्माण झाली. आमिरशी भेटल्यावर नवा उत्साह संचारला आहे.’