Join us  

पहिल्याच सिनेमातून स्टार बनली होती आमिर खानची अभिनेत्री, आता चित्रपटसृष्टीतून लांब जात स्विकारला आध्यात्माचा मार्ग

By सुवर्णा जैन | Published: September 25, 2020 5:18 PM

आशुतोष गोवारीकर यांच्या लगान या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. 'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली. गौरी साकारणारी ही अभिनेत्री म्हणजे ग्रेसी सिंग.आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली. 'लगान'मुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं. 

अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते. सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या. याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली. 

एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले. तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्या करिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. १९९७ साली अमानत मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. या मालिकेत काम करत असतानाच तिने 'लगान' सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली. यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली. मात्र आता ग्रेसीला सिनेमात काम मिळेना. 

त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. 'संतोषी माता' मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली. आपल्याला टिपिकल सासू-सूनांच्या भांडणावर आधारित मालिकांमध्ये रस नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. 

यासह तिने २००९ मध्ये डान्स अकॅडमीही सुरू केली होती.  सध्या ग्रेसी आध्यमात्मकडे वळली आहे. सोशल मीडियावर ब्रम्हकुमारी संदर्भातील सकारात्मक ऊर्जा देणारे सुविचारही ती शेअर करते. ब्रह्मकुमारी संस्थेशी ग्रेसी जोडली गेली आहे.ब्रम्हकुमारीची सदस्य बनल्यानंतर आता तिने लग्न करणार नसल्याचेही म्हटले आहे. तिचे कुटुंबिय तिच्या लग्न करण्यासाठी सांगतात मात्र  लग्न करण्याचा तिचा कोणताही विचार नसल्याचेही तिने सांगितले होते. 

टॅग्स :आमिर खानग्रेसी सिंग