काही चित्रपट अविस्मरणीय ठरतात आणि त्यांच्या निर्मितीची कहाणी त्याहूनही अधिक रंजक असते. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल चाहता है' चित्रपटाशी संबंधित अनेक कथा सतत समोर येत असतात. या चित्रपटात आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्या पात्रांमधील मैत्री खूप आवडली होती. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, आमिर आणि सैफ या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हते. या चित्रपटातील आकाश, सिद्धार्थ आणि समीरची कथा खूपच समर्पक असल्याने अनेक तरुणांना हा चित्रपट आपलासा वाटला. या पात्रांनी अनुभवलेल्या गोष्टींमधून आपणही जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, सैफ अली खान आणि आमिर खान यांच्याऐवजी दुसऱ्या कलाकारांना कास्ट केले असते तर 'दिल चाहता है' कसा झाला असता?
चित्रपटाचा दिग्दर्शक फरहान अख्तरने आता याबद्दल बोलताना सांगितले की, या चित्रपटाबद्दल सर्वात आधी त्याच्या मनात काय विचार आला होता. याबद्दल बोलताना फरहान एका मुलाखतीत म्हणाला की, "त्यावेळी माझ्या मनात एक 'ड्रीम कास्ट' होती, ज्यांच्यासोबत मला हा चित्रपट बनवायचा होता, पण ते शक्य झाले नाही. मला अक्षय खन्ना, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत हा चित्रपट करायचा होता. त्यावेळी हृतिक आणि अभिषेक यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले नव्हते, पण ते त्यांच्या पहिल्या चित्रपटांवर काम करत आहेत हे मला माहीत होतं. त्यामुळे मी विचार केला की, या तिघांना एकत्र घेणे खूपच छान होईल."
आमिर खानने दिला होकारतो पुढे म्हणाला की, "मात्र, या दोन्ही अभिनेत्यांनी हा चित्रपट नाकारला. आमिर हो म्हणेल, असा विचारही मी केला नव्हता. मी जवळपास सगळ्यांशी संपर्क साधला होता, पण कोणालाही मल्टी-हीरो चित्रपट करायचा नव्हता." नंतर हा चित्रपट सुपर हिट झाला.
Web Summary : Farhan Akhtar initially envisioned Hrithik, Abhishek, and Akshay for 'Dil Chahta Hai'. Hrithik and Abhishek declined, leading to Aamir's casting. The film became a hit despite initial reluctance for a multi-hero project.
Web Summary : फरहान अख्तर ने 'दिल चाहता है' के लिए ऋतिक, अभिषेक और अक्षय की कल्पना की थी। ऋतिक और अभिषेक ने मना कर दिया, जिससे आमिर की कास्टिंग हुई। मल्टी-हीरो प्रोजेक्ट के लिए अनिच्छा के बावजूद फिल्म हिट रही।