Join us  

आमिर खानने 'लाल सिंह चड्ढा' च्या ट्रेलरसाठी बनवला मोठा प्लान, इतिहासात पहिल्यांदाच होईल असं...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 4:54 PM

Laal Singh Chaddha Trailer Launch Plan : आता या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, आमिर खानने ट्रेलर लॉन्चसाठी यूनीक प्लान केला आहे.

Laal Singh Chaddha Trailer: बॉलिवूड इंडस्ट्रीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) मुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या या सिनेमाच्या ट्रेलरची फॅन्स आतुरतेने वाट बघत आहेत. आता या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, आमिर खानने ट्रेलर लॉन्चसाठी यूनीक प्लान केला आहे.

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चा ट्रेलर बघण्यासाठी आता जास्त वाट बघावी लागणार नाहीये. पुढील काही दिवसात या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचा ट्रेलर आयपीएल २०२२ च्या फिनालेमध्ये लॉन्च केला जाणार आहे. आयपीएल फिनाले २९ मे २०२२ रोजी होणार आहे आणि याच दिवशी 'लाल सिंह चड्ढा' चा ट्रेलर लॉन्च होणार आहे.

'इंडिया टुडे' च्या एका रिपोर्टनुसार, आमिर खान आणि 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) च्या मेकर्सनी ट्रेलर लॉन्च मोठा प्लान केला आहे. ट्रेलर आयपीलच्या फिनालेमध्ये रिलीज केलं जाणार आहे. 

सूत्रांनी सांगितलं की, मार्केटिंग आणि जाहिरातीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे होईल की, प्रेक्षक इतक्या मोठ्या लाइव्ह इव्हेंटमध्ये एका सिनेमाचा ट्रेलर बघतील. 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) चा ट्रेलर फिनाले मॅचच्या सेकंड हाफमध्ये स्टार स्पोर्ट्सवर टेलीकास्ट केलं जाईल. 

'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा हॉलिवूडचा सिनेमा 'फॉरेस्ट गंप' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात आमिर खानसोबतच करिना कपूर, मोना सिंह आणि नागा चैतन्य दिसणार आहेत. नागा चैतन्य या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. तर आमिर खानही बऱ्याच वर्षांनी पडद्यावर दिसणार आहे. 

टॅग्स :लाल सिंग चड्ढाआमिर खानकरिना कपूरबॉलिवूड