Join us

इतिहासात कधीही नाही घडलं, ते आता आमिर खान करुन दाखवणार, मोठा निर्णय घेतला! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:10 IST

आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्यानं त्याच्या आगामी  'सितारे जमीन पर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडणार आहे.

'सितारे जमीन पर' हा सिनेमा २० जूनला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.त्यानंतर तो थेट युट्यूबवर  'पे-पर-व्ह्यू' (Pay-Per-View) स्वरूपात प्रदर्शित केला जाणार आहे. आत्तापर्यंत हिंदी सिनेमे हे थिएटर रिलीजनंतर जवळपास दोन महिन्यांनी ओटीटीवर रिलीज झालेल. विशेष म्हणजे हे चित्रपट Netflix, ZEE5, Amazon Prime Video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेत. मात्र, आमिरने ही पद्धत मोडीत काढत नवा ट्रेंड सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात अनुभव घेणाऱ्या प्रेक्षकांसोबतच घरबसल्या प्रेक्षकांपर्यंतही दर्जेदार सिनेमे पोहोचावेत, ही त्यामागील भूमिका असल्याचं सांगण्यात येत आहे.

आमिर खानचा २००७ साली 'तारे जमीन पर' सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. 'सितारे जमीन पर' हा 'तारे जमीन पर' या सिनेमाचा सीक्वल आहे. विशेष म्हणजे  'सितारे जमीन पर'या सिनेमात अभिनेत्री जिनिलीया देशमुख (genelia deshmukh) आमिर खानसोबत झळकणार आहे.  या सिनेमाचं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केलं आहे. आमिर खान प्रॉडक्शन, रवी भागचंदका यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र इतकं निश्चित आहे की, आमिर पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करून दाखवणार आहे, जसं तो नेहमीच करत आला आहे.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूडयु ट्यूब