आमिर खान म्हणतोय, सलमानचे वक्तव्य अतिशय दुर्देवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2016 14:42 IST
आमिर खान आणि सलमान खान यांची मैत्री अतिशय घट्ट आहे. आपल्या मित्राने एखादी चूक केल्यास त्याला पाठीशी न घालता ...
आमिर खान म्हणतोय, सलमानचे वक्तव्य अतिशय दुर्देवी
आमिर खान आणि सलमान खान यांची मैत्री अतिशय घट्ट आहे. आपल्या मित्राने एखादी चूक केल्यास त्याला पाठीशी न घालता त्याची चूक त्याला दाखवून द्यावी असे म्हटले जाते. आमिरनेदेखाील आपल्या मित्राने केलेल्या चुकीचे समर्थन न करता त्याला फटकारले आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी एखाद्या बलात्कारित पीडित मुलीची ज्याप्रकारे अवस्था होते, तशी अवस्था आखाड्यातील दृश्य चित्रीत केल्यानंतर माझी होत असे असे वक्तक्य केले होते. हे वक्तव्य हे अतिशय असंवेदनशील आणि दुर्देवी असल्याचे आमिरने दंगल या चित्रपटाच्या पोस्टर लाँचच्यावेळी म्हटले आहे. त्याला सलमानच्या वक्तव्याविषयी विचारले असता सलमानने हे वक्तव्य केले त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. पण सलमानने केलेल्या विधानाविषयी मी मीडियाद्वारे ऐकले आहे. हे विधान अतिशय असंवेदनशील असल्याचे त्याने म्हटले.