Join us

'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगसाठी आमिर खान तुर्कीत, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 12:58 IST

अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगसाठी आमिर तुर्कीला गेला आहे.

आमिर खान लवकरच हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये दिसणार आहे, ज्याचे नाव 'लाल सिंग चड्ढा’ आहे. ज्यात करीना कपूर आणि मोना सिंग महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाला जगभरात लोकप्रियता मिळाली होती. लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. अतुल कुलकर्णी लिखित आणि अद्वैत चंदन दिग्दर्शित या सिनेमाच्या शूटिंगसाठी आमिर तुर्कीला गेला आहे. आमिर खानची तुर्कीमधील शूटिंग करतानचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आमिरने भारतातून शूटिंगसाठी तुर्कीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग भारतात सुमारे 100 ठिकाणी होणार होते, परंतु कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे शूटिंगवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता आणि मध्यभागी शूटिंग थांबवावे लागले. सिनेमाचे अखेरचे शूटिंग पंजाबमध्ये केले गेले. आतापर्यंत सिनेमाचे शूटिंग कोलकाता, दिल्ली, राजस्थान, चंदीगड आणि अमृतसर यासारख्या ठिकाणी झाले आहे.

टॅग्स :आमिर खान