Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील लोकमतच्या मुख्य कार्यालयाला आमिर खाननं दिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 18:30 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं आज कोल्हापुरातील चाहते आणि कुस्ती शौकिनांना भेट दिली

हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं आज कोल्हापुरातील चाहते आणि कुस्ती शौकिनांना भेट दिली. यावेळी आमिर खानने चाहत्यांशी साधलेला हा मनमोकळा संवाद.दंगल या चित्रपटामध्ये अभिनेता आमिर खान कुस्तीपटू महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे कथानक महावीर सिंग फोगट, कुस्ती, आपल्या मुलींना या खेळामध्ये पारंगत बनविण्यासाठी झटणाºया एका वडिलांची कथा आणि जिद्द याभोवती फिरणारे असल्यामुळे या चित्रपटासाठी आमिरने फार मेहनत घेतली आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री साक्षी तन्वर आमिरच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.  २३ डिसेंबरला आमिर आणि त्याच्या धाकड मुलींची दंगल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.