बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याच्या यंदाच्या वाढदिवासाला चाहत्यांना मोठा आश्चर्याचा धक्का दिला. दोन घटस्फोट झालेल्या आमिरने त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख करून देत गौरी स्प्रॅटला कॅमेरासमोर आणलं. त्यानंतर अनेकदा आमिर आणि गौरीला एकत्र स्पॉटही केलं गेलं. तर आमिरची गर्लफ्रेंड गौरीदेखील अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होताना दिसते. अशाच एका पापाराझीवर गौरी मात्र भडकली आहे.
गौरी स्प्रॅटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गौरी मॉर्निंग वॉकला गेल्याचं दिसत आहे. रस्त्यावर चालत असतानाच पापाराझी तिचा व्हिडीओ काढत आहे. हे पाहून गौरी भडकते. आणि पापाराझीला म्हणते, "मला एकटं सोडा...मी चालत आहे". त्यानंतर पापाराझी गौरील बाय बोलून तिथून निघून जातात. पण बाकीचे चाहतेही गौरीचे व्हिडीओ काढत असल्याचं पुढे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल केलं आहे.
"अजून एक जया बच्चन", "ही कोण आहे?", "आमिरचं नाव मिळालं तर अॅटिट्यूड आला", "लवकरच ही पण एक्स होईल", अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आमिरने रीना दत्ताशी पहिलं लग्न केलं होतं. रीनाला घटस्फोट दिल्यानंतर त्याने किरण रावशी संसार थाटला. पण, २०२१ मध्ये त्यांचंही ब्रेकअप झालं. आता तो गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.