Join us

‘ठग’ मध्ये आमिर-दीपिका एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 11:59 IST

 यशराज फिल्म्स बॅनरखाली दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य हे मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दीपिका पादुकोण यांना घेऊन ‘ठग’ हा चित्रपट ...

 यशराज फिल्म्स बॅनरखाली दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य हे मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दीपिका पादुकोण यांना घेऊन ‘ठग’ हा चित्रपट बनवण्याच्या विचारात आहेत. याअगोदर आमिरच्या जागेवर हृतिकला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मात्र, आता आमिरला या चित्रपटात घेण्यात आल्याने दीपिका-आमिरला एकत्र पाहण्याचे त्यांच्या चाहत्यांचे  स्वप्न पूर्ण होणार असे दिसतेय. आमिरने याअगोदर ‘धूम ३’ मध्ये विजय कृष्णा आचार्यसोबत काम केले आहे.आणि जर आमिरने हा चित्रपट साईन केलाच तर मग आमिरचा दिग्दर्शक विजय यांच्यासोबतचा हा दुसरा चित्रपट असेल. या चित्रपटातही आमिर चोराच्या भूमिकेत दिसणार आहे.