‘99 Songs’ ए.आर. रहमानच्या चित्रपटाचे पोस्टर जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:54 IST
आॅस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. आज शुक्रवारी रहमानचा पहिला बॉलिवूडपट ...
‘99 Songs’ ए.आर. रहमानच्या चित्रपटाचे पोस्टर जारी
आॅस्कर विजेता संगीतकार ए.आर. रहमान निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. आज शुक्रवारी रहमानचा पहिला बॉलिवूडपट ‘९९ सॉन्गस’चे पहिले पोस्टर आऊट झाले. एक जोडपे पियानो वाजवत असल्याचे यात दिसत आहे. रहमानने आपल्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचे पोस्टर जारी केले. ‘तुमच्या शुभेच्छांसह माझ्या पहिल्या चित्रपटाचे पोस्टर जारी करताना मला अतिशय आनंद होत आहे...’ अशा शब्दांत रहमानने आपला आनंद साजरा केला. यानंतर काहीच क्षणात रहमानवर शुभेच्छांचा वर्षाव व्हायला लागला. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमीर खान याने रहमानला शुभेच्छा दिल्या. ‘‘ शानदार पोस्टर रहमान...शूट शुरू करने के लिए शुभकामनाएं। आपको इसमें सफलता मिले ’’ अशा शब्दांत आमीरने रहमानला शुभेच्छा दिल्या. आमीरच्या ‘रंगीला’, ‘लगान’, ‘मंगल पांडे: दी राईजिंग’ आणि ‘गजनी’ या चित्रपटांना रहमानचेच संगीत होते.विश्वेश कृष्णमूर्ती हे ‘९९ सॉन्ग्स’ दिग्दर्शक आहेत. यशस्वी संगीतकार बनण्यासाठी अपार संघर्ष करणाºया एका गायकाची कथा यात आहे. पुढीलवर्षी रहमानचा पहिला वहिला चित्रपट प्रदर्शित होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत रहमानला शुभेच्छा देऊ यात!!!