Join us

8291_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 17:59 IST

पंचमदा यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त ‘लव्ह यू पंचमदा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सायन येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित केलेल्या या मैफलीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. मैफलीत भूपेंदर मिताली, राजू शेरले, जोशुआ सिंग, केसरी लॉर्ड, उत्तम सिंग, शब्बीर कुमार, सचिन पिळगावकर, सुरेश आणि पद्मा वाडकर उपस्थित होते. यावेळी पंचमदांच्या आठवणी शब्दसुरात व्यक्त करण्यात आल्या. मैफलीत सादर होणाºया प्रत्येक गाण्यातून पंचमदांच्या आठवणी ताज्या होत होत्या. प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणाआधी निवेदनातून पंचमदांच्या आठवणींना उजाळा दिला जात होता. त्यामुळे वातावरण भावनिक झाले होते, तसेच अधुन-मधून हास्यांचे फुवारे देखील उडत होते. कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा आशा भोसले केक कापला तेव्हा सभागृहातून एकच आवाज आला. ‘हॅप्पी बथर्ड पंचमदा’ यावेळी आशातार्इंनी ‘आय लव्ह पंचमदा... असे म्हणत भावना व्यक्त केल्या. हेच नाव या कार्यक्रमासाठी खुप आधी ठरविण्यात आले होते असेही आशातार्इंनी सांगितले. मैफलीचे आयोजन नितीन शंकर यांनी केले होते.