8250_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2016 21:24 IST
सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली.
8250_article
सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यानंतर सैफला तात्काळ मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले होते. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. आज सोमवारी सैफला रूग्णालयातून सुटी मिळाली. सैफची बहिण सोहा हिने सैफ ठिक असल्याचे सांगितले होते. सैफ ठिक आहे. त्याच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली होती. पण आता तो ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असे सोहा म्हणाली होती. . सैफने अलीकडे ‘रंगून’चे शूटींग पूर्ण केले. आता तो अक्षत वर्मा दिग्दर्शित स्वत:च्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात बिझी आहे. यापूर्वी विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही सैफच्या हाताला इजा झाली होती. त्यापूर्वी ‘एजंट विनोद’च्या एका अॅक्शन दृश्याच्या शूटींगदरम्यानही तो जखमी झाला होता.