सात वर्षांपूर्वी जान्हवीने फेमिना मिस इंडियाला सांगितले होते. 29 जून 2011 च्या फेमिना मिस इंडिायामध्ये जान्हवीने श्रीदेवी यांच्यासाठी लिहिले होते की, '' मी मोठी होताना तुमच्याबाबत खूप काही ऐकले आहे. तुमचे कामबाबत असलेले प्रेम, कमिटमेंट हे माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत. तुला बघताना असे नेहमी वाटते की मी त्यावेळी का नव्हते ?, मी तुझ्या यशाची साक्षीदार का नाही बनले ? तु आयुष्यात जे काही मिळवले आहेस, ते बघून मला नेहमीच तुझी मुलगी असल्याचा अभिमान वाटतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझी मुलगी जान्हवी कपूर.''
ALSO READ : रेस्ट इन पीस, माय लव्ह...! बोनी कपूर यांनी लिहिली भावूक करणारी पोस्ट!!
श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी हिचा आजपासून बरोबर सहा दिवसांनी वाढदिवस आहे. यादिवशी जान्हवी २१ वर्षांची होणार आहे. मात्र पहिल्यांदाच जान्हवीसोबत तिची मॉम श्रीदेवी नसणार आहे. वास्तविक जान्हवी श्रीदेवीच्या खूप क्लोज होती. त्यात श्रीदेवी यांची ती पहिलीच मुलगी असल्याने तिला त्यांचे प्रचंड प्रेम लाभले. प्रत्येक इव्हेंटमध्ये श्रीदेवी आणि जान्हवी एकत्र बघावयास मिळत असत. जान्हवीच्या पहिल्या चित्रपटासाठी श्रीदेवी यांनीच तिला ग्रूम केले होते. आई आणि मुलीच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नातं त्यांच्यात जास्त होते. खुशी आणि जान्हवी कपूरचा संभाळ करण्यासाठी त्यांनी जवळपास आपल्या करिअरमधून 15 वर्षांचा ब्रेक घेतला होता.