Join us

'7 Hours to Go'च्या टीमने विकली ‘फॅन’ची तिकिटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 16:14 IST

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवे नवे फंडे काढणाºयांची बॉलिवूडमध्ये कमतरता नाही.  हेच बघा ना, '7 Hours to Go' हा चित्रपट लवकरच ...

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नवे नवे फंडे काढणाºयांची बॉलिवूडमध्ये कमतरता नाही.  हेच बघा ना, '7 Hours to Go' हा चित्रपट लवकरच रिलीज होतो आहे. या चित्रपटाचा टिजर अलीकडे रिलिज झाला. या टीजरच्या प्रमोशनसाठी '7 Hours to Go'ची टीम शाहरूख खान याच्या ‘फॅन’ या चित्रपटाचे तिकिटे विकताना दिसली.  संदीपा धर आणि नताशा स्तांकोविक या  '7 Hours to Go'च्या अभिनेत्रींनी तिकिटघरात ‘फॅन’ची तिकिटे विकण्यासोबतच  आपल्या अपकमिंग मुव्हिचे प्रमोशनही केले. शाहरूख खान सुपरस्टार आहे. आम्ही त्याचे चाहते आहोतच. त्यामुळेच आम्ही आज एक आगळावेगळा प्रयोग केला. ‘फॅन’च्या ‘फॅन’ला आमच्या चित्रपटाबद्दल कळावे, अशी आमची इच्छा आहे, असे संदीपाने यावेळी सांगितले. प्रेक्षकांना तिकिटे विकता विकता आपल्या चित्रपटाचे हे आगळेवेगळे प्रमोशन संदीपा व नताशाने चांगलेच एन्जॉय केले. येत्या २७ मे रोजी '7 Hours to Go' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.