Join us

राजकुमार रावच्या ‘5 वेडिंग्स’चा दुसरा ट्रेलर रिलीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 15:41 IST

लवकरच राजकुमारचा असाचं एक हलका-फुलका कॉमेडी चित्रपट येतोय. ‘5 वेडिंग्स’ असे या चित्रपटाचे नाव. आज या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. 

राजकुमार राव सध्या जोरात आहे. एकापाठोपाठ एक असे त्याचे अनेक सिनेमे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत राजकुमार राव अनेक चित्रपटांत दिसला. यातील काही भूमिका गंभीर होत्या तर काही हलक्या-फुलक्या. सिटी लाईट्स, शाहिद, अलीगड, ट्रॅप्ड, ओमर्टा सारख्या चित्रपटात राजकुमारने अतिशय दमदार भूमिका साकारल्या. याऊलट बरेकी बर्फी, क्वीन, शादी में जरूर आना, बहन होगी तेरी सारख्या चित्रपटात त्याने विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लवकरच राजकुमारचा असाचं एक हलका-फुलका कॉमेडी चित्रपट येतोय. ‘5 वेडिंग्स’ असे या चित्रपटाचे नाव. आज या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला. 

नावावरूनच हा भारतीय लग्न संस्कृतीवर आधारित चित्रपट आहे, हे तुमच्या लक्षात येईल. या चित्रपटात राजकुमारच्या अपोझिट नर्गिस फाखरी मुख्य भूमिकेत आहे. राजकुमारने यात एका पोलिसाची भूमिका साकारली आहे तर नर्गिस पत्रकाराच्या भूमिकेत दिसतेय,

 नम्रता सिंह गुजराल दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २१ सप्टेंबरला रिलीज होतोय.यादरम्यान राजकुमारचे तीन चित्रपट एकापाठोपाठ रिलीज होत आहेत. येत्या ३१ आॅगस्टला त्याचा ‘स्त्री’ येतोय. यानंतर १४ सप्टेंबरला ‘लव्ह सोनिया’ प्रदर्शित होतोय.

टॅग्स :राजकुमार राव