Join us

५५ अंध मुलींचे स्वप्न वरूणने केले साकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 12:36 IST

चार्मिंग वरूण धवन याचा बॉलीवूडमधील यशाचा आलेख तुफान गतीने पुढे सरकत आहे. त्याचा पॉवरफुल स्क्रीन प्रेझेन्स, लाईव्हली परफॉर्मन्सेस, स्ट्राँग ...

चार्मिंग वरूण धवन याचा बॉलीवूडमधील यशाचा आलेख तुफान गतीने पुढे सरकत आहे. त्याचा पॉवरफुल स्क्रीन प्रेझेन्स, लाईव्हली परफॉर्मन्सेस, स्ट्राँग पर्सनॅलिटी यांच्यामुळे त्याने युवा स्टार्समध्ये स्वत:ची एक वेगळी इमेज बनवली आहे.त्याचा बिनधास्त अ‍ॅटिट्यूड, फंकी स्टाईल स्टेटमेंट यांच्यामुळे त्याची फॅन फॉलोर्इंगही वाढत चालली आहे. आणि आता तो पुन्हा चर्चेत आलाय. त्याने नुकतेच एका सामाजिक सेवा संस्थेत ५५ अंध मुलींची भेट घेतली. मुलीही त्याला भेटण्यासाठी तेवढ्याच उत्सुक होत्या.त्यांनी त्याची कंपनी खुपच एन्जॉय केली. त्यांनी त्याच्यासोबत फोटोही काढले. वरूण याअगोदर अ‍ॅक्शन-कॉमेडी वर आधारित दिलवाले मध्ये दिसला होता. ‘ढिशूम’ चित्रपटासाठी तो आता खुपच मेहनत घेतो आहे. यात जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.