Join us

3872_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 09:20 IST

बॉलीवुडचा मुन्नाभाई संजय दत्त नुकताच शिक्षा भोगून जेलमधून सुटला असून, भुतकाळ विसरून चांगले भविष्य घडविण्यासाठी तो सध्या धडपड करीत आहे. मात्र संजय जेलची हवा खाणारा एकमेव अभिनेता नसून यापूर्वी देखील बºयाचशा स्टार्सच्या हातात बेड्या पडल्या आहेत....

बॉलीवुडचा मुन्नाभाई संजय दत्त नुकताच शिक्षा भोगून जेलमधून सुटला असून, भुतकाळ विसरून चांगले भविष्य घडविण्यासाठी तो सध्या धडपड करीत आहे. मात्र संजय जेलची हवा खाणारा एकमेव अभिनेता नसून यापूर्वी देखील बºयाचशा स्टार्सच्या हातात बेड्या पडल्या आहेत....आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत संजय दत्तने तब्बल ५७ महिने शिक्षा भोगली. त्याची नुकतीच सुटका झाली आहे.बॉलीवुडचा दबंग स्टार सलमान खान काळविटाच्या शिकार प्रकरणात जेलची हवा खावून आला आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल येणे बाकी असल्याने सलमानला शिक्षा होईल की तो निर्दोष सुटेल हा प्रश्न अजुनही अनुत्तरीतच आहे.कित्येक हिट चित्रपट देणारा अभिनेता शाइनी आहूजाला मोलकरनीवरील बलत्काराच्या आरोपाखाली २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे.२००६ मध्ये बाइकवर भरधाव वेगात येवून दोन लोकांना चिरडल्याप्रकरणी जॉन अब्राहमला देखील जेलमध्ये जावे लागले. मात्र त्याला लगेचच बेलही मिळाली.अभिनेता फरदीन खानला सट्टेबाजीच्या आरोपाखाली जेलची हवा खावी लागली.अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम याची गर्लफ्रेंड राहिलेल्या अभिनेत्री मोनिका बेदी हिला जवळपास दोन वर्ष जेलची हवा खावी लागली. सध्या ती शिक्षा भोगून बाहेर पडली आहे.