Join us

3869_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 03:26 IST

फुले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे, असे आपण मानतो. जगात २,७०,००० इतक्या फुलांचे प्रकार आहेत. काही फुले ठराविक काळात किंवा हंगामात येतात. काही फुले तर दशकानंतर उमलतात. जगातील अशा सुंदर फुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

फुले ही निसर्गाने दिलेली सुंदर देणगी आहे, असे आपण मानतो. जगात २,७०,००० इतक्या फुलांचे प्रकार आहेत. काही फुले ठराविक काळात किंवा हंगामात येतात. काही फुले तर दशकानंतर उमलतात. जगातील अशा सुंदर फुलांची माहिती या ठिकाणी देत आहोत.जगातील सुंदर फुलांपैकी एक. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येच हे फुल सापडते. हे गुलाबासारखे असून, गडद गुलाबी रंग असतो. १८०४ साली जॉन मिडलमिस्ट यांनी चीनहून लंडनला याचे रोपटे आणले. त्यानंतर चीनमधून हे फुल कायमचे नष्ट झाले.हे फुल नख्याच्या आकाराचे असून, सुमारे ३ मीटर इतके वाढते. वाटाण्याच्या प्रजातीमध्ये याचा समावेश होतो. हवामान बदलामुळे आणि प्रदूषणामुळे हे जगात आता दुर्मिळ बनले आहे. फिलीपिन्सच्या जंगलात हे फुल आढळते.इंडोनेशियाच्या काही भागात दिसणारे हे फुल अत्यंत मोठे आणि वास देणारे म्हणून ओळखले जाते. हे तीस ते चाळीस वर्षात एकदाच उमलते. साधारणत: २० फुट इतके उंच असते. बाहेरुन हिरवे आणि आतून गडद लाल रंग असतो.पिवळ्या आणि जांभळ्या रंगाचे लेडी स्लीपर्स हे मुख्यत: लंडन आणि युरोपमध्ये आढळते. आॅर्किड परिवारातील हे दुर्मिळ फुल आहे. पिवळ्या आणि जांभळ्या रंगात आढळते. यामध्ये तीन चतुर्थांश भाग हा पिवळा आणि उर्वरित भाग हा जांभळ्या रंगाचा असतो.चॉकलेट कॉसमॉस हे जगातील आणि मेक्सिकोमधील सर्वात सुंदर फुल आहे. याचा लाल आणि तपकिरी रंग असतो. उन्हाळ्यात संध्याकाळी हे फुल उमलते. सध्या चॉकलेट कॉसमॉसचे आणखी एक क्लोन आहे. कायद्याने या फुलाला संरक्षण देण्यात आले आहे. जगभरात हनीमूनसाठी मेक्सिकोला मागणी आहे.पोपटाच्या चोचीसारखा याचा आकार आहे. यामुळे याला पोपटाची चोच असेच नाव देण्यात आले आहे. वसंत ऋतुमध्ये हे अत्यंत मनोहारी दिसते. कॅनरी बेटावर हे सुंदर फुल उमलते. जगभरात ही प्रजाती अत्यंत दुर्मिळ झाली आहे. कॅनरी बेटावरील कायद्यानुसार याला संरक्षण देण्यात आले आहे.कोळ्यासारखे आकाराचे हे सुंदर फुल आहे. क्युबा आणि फ्लोरिडामध्ये हे आढळून येते. याच्या वाढीसाठी ज्या ठिकाणी पोषक वातावरण असते, अशा ठिकाणी हे वाढते. हे फुल स्वत:च अन्न तयार करते. एप्रिल ते आॅगस्ट या तीन आठवड्यात हे फुल उमलते. साबणासारखा याला वास असतो.हे अत्यंत पिटुकल्या आकाराचे फुल, ज्याला साबणासारखा वास असतो. या फुलाला बुद्ध धर्मात स्थान आहे. गेल्या ३००० वर्षापासून याचा टवटवीतपणा कायम आहे असे म्हटले जाते. चीन, कोरिया, तैवान आणि अमेरिकेतील काही ठिकाणी हे आढळते. चीनमधील डींग या शेतकºयाने हे शोधून काढले.श्रीलंकेच्या जंगलात आढळणारे हे सुंदर फुल. याचा वासही छान असतो. जगातील सर्वात महागडे फुल असेही म्हटले जाते. मध्यरात्रीच्या सुमारास हे उमलत असल्याने खूप कमी लोकांना हे दिसते.अत्यंत कमी काळ उमलणारे फुल म्हणून याची ओळख आहे. जिब्राल्टरच्या प्रदेशात आढळते. जिब्राल्टर आणि लंडनच्या बागांमध्ये सध्या दिसून येते.