3858_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 01:34 IST
बॉलीवूडमध्ये आजघडीला सर्वोच्च शिखरावर अनेक स्टार आहेत. या स्टार मंडळीचे चित्रपटसृष्टीत कसे पर्दापण झाले. त्यांचा पहिला चित्रपट कोणता व तो कोणत्या वर्षी प्रदर्शीत झाला अशा काही सुप्रिसद्ध स्टारची ही माहिती...
3858_article
बॉलीवूडमध्ये आजघडीला सर्वोच्च शिखरावर अनेक स्टार आहेत. या स्टार मंडळीचे चित्रपटसृष्टीत कसे पर्दापण झाले. त्यांचा पहिला चित्रपट कोणता व तो कोणत्या वर्षी प्रदर्शीत झाला अशा काही सुप्रिसद्ध स्टारची ही माहिती...बॉलीवूडचा बादशाह म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते. १९९२ मध्ये आलेला ‘दिवाना ’हा त्याचा पहिला चित्रपट आहे. त्याला या चित्रपटामुळे फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळालेला आहे. १९६९ मध्ये आलेला ‘सात हिंदुस्थानी’ हा अमिताभ बच्चनचा पहिला चित्रपट आहे. तो आजघडीला बॉलीवूडचा सर्वात लोकप्रिय अभिनेता आहे. नासीर हुसैन निर्माता असलेला ‘यादों की बारात’ हा आमिर खानचा पहिला चित्रपट आहे. त्याने या चित्रपटात बालकलाकाराची भूमीका केलेली आहे. १९७३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. १९९१ मध्ये प्रदर्शीत झालेल्या ‘फुल और काँटे या चित्रपटापासून अजय देवगनचे चित्रपट करिअर सुरु झाले. त्यानंतर त्याने भूमीका केलेल्या जख्म व द लेजेंड आॅफ भगतसिंह या चित्रपटांमुळे त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. बीवी हो तो ऐसी या १९८८ मध्ये प्रदर्शीत झालेल्या चित्रपटापासून सलमान खानची चित्रपटसृष्ट्रीत एन्ट्री झाली. १९८९ मध्ये प्रदर्शीत झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटामुळे त्याला खरे यश मिळाले.